पश्चिम पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि विद्यार्थी नेते कांतकुमार यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

केपीएससी घोटाळा आणि नोकरभरतीतील गैरव्यवहाराविरोधात लढा देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रशासनातील आणि राजकारणातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असून तरुण, महिला व ज्येष्ठांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या मतदारसंघात ९५ हजार मतदार असून चारही जिल्ह्यांतून आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.


Recent Comments