धारवाड येथील पश्चिम पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेसचे उमेदवार मोहन लिंबिकाई यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


कडेप्पा मैदानापासून सुरू झालेली ही रॅली जुबली चौक आणि कोर्ट चौक मार्गाने पुढे गेली. त्यानंतर काँग्रेस उमेदवार मोहन लिंबिकाई यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या रॅलीत धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड, आमदार लक्ष्मण सवदी, एन. एच. कोनरेड्डी, श्रीनिवास माने यांच्यासह धारवाड शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.




Recent Comments