नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवण्याच्या उद्देशाने ‘प्रजासेवा आंदोलन’ राबवले जात असून, प्राप्त अर्जांवर अधिकाऱ्यांनी विनाविलंब कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

खानापूर येथील लोकमान्य टिळक भवनात आयोजित ‘प्रजासेवा आंदोलन’ सभेत नागरिकांच्या तक्रारी व अर्ज थेट स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि सरकारी सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी अर्ज तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अरण्य, महसूल, सार्वजनिक बांधकाम, स्मशानभूमी मंजुरी आणि शाळा इमारतींशी संबंधित सुमारे २०० तक्रार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली.

या सर्व अर्जांची प्राधान्याने पाहणी करून नियमानुसार लवकरात लवकर निकाल लावला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



Recent Comments