Uncategorized

हंपीत तुंगभद्रा नदीत बुडून माय-लेकीचा मृत्यू

Share

आंध्र प्रदेशातून पर्यटनासाठी आलेल्या माय-लेकीचा तुंगभद्रा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे घडली.

आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील शाहीन (३८) आणि त्यांची मुलगी यास्मिन (१३) या आपल्या नातेवाईकांसह हंपी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. स्नानासाठी नदीत उतरल्या असता मुलीला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली.

मुलीला वाचवण्यासाठी आईने तत्काळ नदीत उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने त्या दोन्ही पाण्यात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच हंपी पर्यटन पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली.

काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी माय-लेकीचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: