विजयनगर जिल्ह्यातील हगरीबोम्मनहळ्ळी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पती-पत्नीतील वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात आलेल्या खलील नावाच्या व्यक्तीला मारहाण करून ठार मारल्याचा गंभीर आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून दोन पोलिसांना ताब्यात घेण्यात आले.

या घटनेची गंभीर दखल घेत विजयनगरच्या पोलीस अधीक्षक जाह्नवी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन एफआयआर नोंदवला. तक्रारीच्या आधारे हेड कॉन्स्टेबल इट्टगी राघवेंद्र आणि पोलीस कॉन्स्टेबल व्यंकटेश यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.
-0-घटनेची माहिती मिळताच बळ्ळारी क्षेत्राचे आयजीपी डॉ. हर्ष यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधीक्षक जाह्नवी आणि डीवायएसपी मल्लेश दोडमनी घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.



Recent Comments