Uncategorized

तुंगभद्रा जलाशयात मासेमारीसाठी गेलेले तीन युवक बेपत्ता; एकाचा मृतदेह आढळला

Share

तुंगभद्रा नदीच्या जलाशयात मासेमारीसाठी गेलेले तीन युवक बेपत्ता झाले असून, त्यापैकी एकाचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना विजयनगर जिल्ह्यातील हगरीबोम्मनहळ्ळी तालुक्यातील तांब्रहळ्ळी गावात घडली आहे.

राजू (वय २२), यमनप्पा (वय २०) आणि अज्जप्पा (वय २६) अशी बेपत्ता झालेल्या युवकांची नावे आहेत. काल दुपारी मासेमारीसाठी गेलेले हे तिघेही रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर तांब्रहळ्ळी पोलीस आणि स्थानिकांनी शोधमोहीम राबवली असता यमनप्पा याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. उर्वरित दोन युवकांचा शोध घेण्यासाठी हगरीबोम्मनहळ्ळी पोलिसांनी एसडीआरएफ (SDRF) पथकाला पाचारण केले असून पोलीस पथक घटनास्थळी ठिय्या मांडून शोधकार्य तीव्र करत आहे.

Tags: