बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना स्वतः सोबत जावे लागत आहे. नगर पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


कित्तूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्याने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याने चिंतीत झालेले पालक मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना स्वतः सोबत घेऊन शाळेत सोडत आहेत.

मोकाट कुत्र्यांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ जागे होऊन या समस्येवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Recent Comments