कित्तूर तालुक्यातील अवरादी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिकासह त्यांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी ४८ तासांत तीन आरोपींना अटक केली आहे.


१६ सप्टेंबर रोजी सकाळी अवरादी ग्रामपंचायत कार्यालयात मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली होती. बसप्पा कुंदरगी, संगप्पा कुंदरगी आणि मडीवाळप्पा कुंदरगी यांनी धारवाड येथील रहिवासी माजी सैनिक रुद्रप्पा कुंदरगी आणि त्यांची मुलगी शशिकला कुंदरगी यांच्यावर हत्यारांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. तसेच कारचालक राहुल याच्यावरही आरोपींनी हल्ला केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कित्तूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास चक्र फिरवून ४८ तासांच्या आत तीनही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तपासाचे कौतुक केले आहे.


Recent Comments