Kittur

भाजपच्या आरोपांना आमदार बाबासाहेब पाटील यांचे उत्तर

Share

आयुष्मान आरोग्य केंद्रांच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना डावलल्याच्या भाजपच्या आरोपांवर कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा त्यांनी दिला.

बैलहोंगल तालुका आरोग्य कार्यालयावर मोर्चा काढत भाजपने आमदारांवर सरकारी कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. हा आरोप फेटाळताना आमदार पाटील म्हणाले की, मतदारसंघाचा विकास करणे आणि जनतेची कामे मार्गी लावणे हे आपले मुख्य ध्येय आहे. निष्कारण वादात अडकण्याऐवजी योग्य वेळ आल्यावर आपण यावर भाष्य करू.

तसेच बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने जिल्ह्याला आणखी एका मंत्रिपदाची गरज असून याबाबत हायकमांड योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कित्तूरचा एक आदर्श मतदारसंघ म्हणून विकास करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी या वेळी पुनरुच्चारले.

शानूल मत्तेखान
कित्तूर

Tags: