कित्तूर येथील सराफी दुकानातील चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी राजस्थानमधील चार आणि मध्य प्रदेशातील एका अशा एकूण पाच आंतरराज्यीय चोरट्यांना अटक केली आहे.


आरोपींकडून १७ लाख रुपये मूल्याचे ७ किलो चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपयांची आय२० कार जप्त करण्यात आली आहे. गेल्या १२ ऑगस्टच्या रात्री मानज्जा सराफी दुकानाचे शटर तोडून आत शिरलेल्या आरोपींनी चांदीचे दागिने चोरून पोबारा केला होता. याप्रकारणी गुन्हा दाखल करून तपास करत पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख बसरगी आणि डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली.


Recent Comments