धारवाडमध्ये श्रीरामेनेचे आंदोलन

गोमातेला राष्ट्रीय प्राणि घोषित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीरामेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांदरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

देशात गोहत्या सुरू असून मांस निर्यातही थांबलेली नाही, असा आरोप श्रीरामेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षांपासून सत्तेत आहेत, तरीही त्यांना गोवंश हत्येचे वास्तव दिसत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राने दिलेले आश्वासन पाळत गोमातेला लवकरात लवकर राष्ट्रीय प्राणि घोषित करावे, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
स्वातंत्र्याच्या दशकांनंतरही गोवंशाचे रक्षण होत नसल्याबद्दल मुतालिक यांनी नाराजी व्यक्त केली. राजकारण्यांना गोदुग्ध आणि इतर उत्पादने हवी आहेत, पण गोहत्या थांबवण्यात स्वारस्य नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला. गोमाता वाचवण्यासाठी आणि गोहत्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आल्याचे प्रमोद मुतालिक यांनी म्हटले.


Recent Comments