Dharwad

नीट प्रकरणी सरकार गांभीर्याने विचारशील : मंत्री प्रल्हाद जोशी

Share

पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, देशातील विविध राज्यांमध्ये यापूर्वीही पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, केंद्र सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कडक पावले उचलली जातील.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनात काही समाजकंटक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून आले असून, हिंसक घटना घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे खऱ्या विद्यार्थ्यांनी अशा तत्वांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

नीट परीक्षेसाठी देशभरात २२ लाख विद्यार्थी बसले होते. सरकार या विषयावर पूर्णपणे लक्ष ठेवून असून योग्य ती पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: