Belagavi

बेळगाव काँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वाद

Share

बेळगावमधील काँग्रेस कार्यालयातील घडामोडींवर प्रकाश

बेळगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या काँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. विविध गटांमधील चुरशीमुळे ही बैठक काहीशी वादावादीची ठरली.

आमदार आसीफ सेठ यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत माजी आमदार रमेश कुुुडुची यांच्या समर्थकांमध्ये आणि इतरांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकारानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे कार्यालयात किंचित तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पक्षीय पातळीवर राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातून संघटन मजबूत करण्याचे काम सुरू असून, जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जात आहे, असे आमदार आसीफ सेठ यांनी नमूद केले. पक्षात कोणतीही मोठी हाणामारी झालेली नसून केवळ विचार मांडताना झालेली ही किरकोळ चर्चा होती, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Tags: