महाराष्ट्रातील पुणे येथे नुकत्याच झालेल्या सीबीएसई दक्षिण क्षेत्रीय ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत चिकोडी येथील सीएलई संस्थेच्या के के सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


दहावीची विद्यार्थिनी सिंचना माळगे आणि नववीची दिया लडगे यांनी रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्तरावरील ज्युदो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. याच स्पर्धेत समर्थ किलारे, वरुण हमंजी आणि दिया हलबावी यांनी अटीतटीच्या सामन्यांमध्ये कांस्य पदके जिंकली, तर ध्रुव कोळी आणि वर्षिणी बस्तवाडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत आपले कौशल्य दाखवले.

राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या आणि पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे सीएलई संस्थेचे सचिव जगदीश एम. कवतगीमठ, संचालक मल्लिकार्जुन जे. कवतगीमठ, प्रशासकीय अधिकारी सागर आय. बिस्कोफ आणि प्राचार्या स्मिता एन. शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असल्याचे वृत्त शाळेतर्फे देण्यात आले.


Recent Comments