उगार बुद्रुक येथील श्री पद्मावती शिक्षण संस्थेच्या आवारात पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण या उद्देशाने कार्यरत असलेली ‘श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना’ ही एक लोकचळवळ बनली आहे, असे योजनेचे कागवाड-अथणी तालुका अधिकारी संजीव मराठे यांनी सांगितले.

पर्यावरण टिकले तरच मानवी जीवन सुरक्षित राहील, हा संदेश देत या योजनेअंतर्गत ऐनापूर, उगार, कुसनाळ आणि कागवाड शहरातील शाळांमध्ये ५५० रोपे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शाळांमध्ये माध्यान्ह आहार तयार करण्यासाठी आवश्यक असलेली कढीपत्ता आणि शेवग्याची रोपे या वेळी वाटण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीसाठी वृक्ष दिंडी काढली.
या कार्यक्रमाला पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव मनोहर चौगुले, संचालक सुरेंद्र कुसनाळे, अण्णासाहेब नांदगावे, अमीन शेख, प्रशांत वसवाडे, धर्मस्थळ योजनेचे सेवा प्रतिनिधी शिवप्पा, सुरेश, सुशम्मा अलतग्गे, यशोदा चौगुले, दिपाली पमन्नावर आणि शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments