कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील सन्मती विद्यालयात ‘अक्षर दासोह’ योजनेचा आढावा घेण्यात आला.

या वेळी चिक्कोडीचे माध्यान्ह आहार योजना शिक्षणाधिकारी राजेंद्र तेरदाळे यांनी, ही योजना विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि उपस्थिती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरल्याचे सांगितले.

या योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांची शालेय गळती थांबली असून सर्व स्तरांतील मुले एकत्र जेवत असल्याने सामाजिक सलोखा निर्माण होत आहे. तसेच ‘क्षीरभाग्य’ योजनेतून दूध आणि अंडी दिली जात असल्याने कुपोषण कमी होत आहे, असे ते म्हणाले. चिक्कोडी जिल्ह्यातील आठ विभागांमधील एकूण ३,२०,५७२ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
दरम्यान, शेडबाळच्या सन्मती विद्यालयाने ‘एसएसएलसी’ परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवल्याबद्दल आणि येथील विद्यार्थी संतोष रत्नापगोळ याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. या वेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका एम. एन. काळेनट्टी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आहार साहाय्यक संचालक मल्लिकाpostर्जुन नामदार आणि शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments