Kagawad

उगार साखर कारखाना बचावासाठी बेळगावात शेतकरी कामगारांचा मोर्चा

Share

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील प्रसिद्ध उगार साखर कारखान्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित खोट्या पर्यावरणीय आरोपांच्या निषेधार्थ शेतकरी आणि कामगारांनी बेळगावात मोर्चा काढला.

कारखान्याविरोधातील कथित खोट्या पर्यावरणीय तक्रारींमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये, अशी मागणी करत उगार साखर कारखान्याचे कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगार, शेतकरी आणि परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचा विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कारखान्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन त्या दूर कराव्यात. मात्र कोणत्याही कारणामुळे कारखान्याच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, अशी मागणी शेतकरी आणि कामगारांनी केली. कारखान्याला अडचण निर्माण झाल्यास शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रफुल्ल थोरुशे यांनी केली.

या आंदोलनात उगार साखर कारखान्याचे मोठ्या संख्येने कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.

Tags: