बेळगाव येथील समर्थ नगरातील एसटीएम गल्लीत श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रविवारी संध्याकाळी सत्यनारायण पूजा आणि महाआरती पार पडली. यावेळी गल्लीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोनवाळ गल्लीतील गजराज भजनी मंडळाने आरतीचे सादरीकरण केले.

यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित विविध मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महाप्रसादाचा २५०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. यावेळी गल्लीतील नागरिक, महिला मंडळाच्या सदस्या आणि युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments