कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील आशा-प्रभू रुग्णालयात डॉ. शीतल न्यमगोडर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिवंगत पी. डी. न्यमगोडर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि गणेशोत्सवाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विटा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ८० तरुणांनी रक्तदान केले. तसेच गरोदर महिलांसाठी मोफत सोनोग्राफी, ईसीजी आणि एक्स-रे सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि गरोदर महिलांसाठी ओटी भरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे २०० महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. डॉ. शीतल न्यमगोडर यांनी गेल्या दोन वर्षांपासून वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे सांगितले.

शिक्षिका शशिकला गलगली यांनी डॉ. शीतल यांच्या सामाजिक सेवेचे कौतुक केले. या प्रसंगी नगर पंचायत अध्यक्ष उत्कर्ष पाटील, सचिन जगताप, महेश घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. सुनील मालगावे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.



Recent Comments