Kagawad

शिरगुप्पी शुगर्समध्ये २३ सप्टेंबरला बॉयलर पूजन

Share

कागवाड येथील शिरगुप्पी शुगर वर्क्स साखर कारखान्याचा २०२६-२७ या वर्षाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी बॉयलर पूजन पार पडणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष के. पी. मगेण्णवर यांनी सांगितले.

वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. साखर कारखाना, बँक आणि शाळेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना मदत झाली असून, मिळालेला ‘सहकार रत्न’ पुरस्कार हा सर्व संस्थांचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी हुल्लोळी श्रीमठाचे मंजुनाथ स्वामीजी यांनी के. पी. मगेण्णवर यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला.

महाराष्ट्र व कर्नाटक शासनाने १५ ऑक्टोबरपूर्वी गळीत हंगाम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊस उत्पादन घटले आहे. शासनाने घोषित केलेला दर देण्यास कारखाना तयार असल्याचे उपाध्यक्ष अरुण परांडे यांनी सांगितले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक महावीर उगाणवर, अरुण जोशी, लक्ष्मण सूर्यवंशी, एस. एम. कोणे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: