मंदिरे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असून ती सर्वसामान्यांमध्ये संस्कार घडवणारी आणि दिव्यता देणारी केंद्र आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक राज्य देवालय संवर्धन समितीचे राज्य संयोजक मनोहरजी मठद यांनी केले.

बसव कॉलनीतील बसवण्णा मंदिरात आयोजित बेळगाव शहर देवालय संवर्धन समितीच्या संयोजक व अर्चकांच्या दुसऱ्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंदिरे केवळ भक्तीचीच नव्हे, तर अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची शक्तिपीठे बनली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

मंदिर समित्यांचे कामकाज, धार्मिक आचारविचार आणि पूजेबाबत माहिती देण्यासाठी ऑक्टोबरअखेर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनोहरजी यांनी सांगितले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोमशेखर हिरेमठ होते.

यावेळी श्रीकांत कदम, कल्लप्पा गाणिगेर, सी. व्ही. सावदी, सुरेश गणाचारी, एम. सी. पाटील, एस. व्ही. दोडवाड, सतीश माळवदे यांच्यासह रामतीर्थ नगर, श्रीनगर, बसव कॉलनी व शिवबसव नगर भागातील मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments