पुण्यातील ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी’ संस्थेकडून केंपवाड येथील ‘अथणी फार्मर्स शुगर वर्क्स’चे अध्यक्ष व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांना ‘उत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुण्यात आयोजित ७१ व्या वार्षिक सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या हस्ते आणि सोहन शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अथणी फार्मर्स साखर कारखान्याला २५ वर्षे पूर्ण झाली असून, श्रीमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत इतर ४ कारखाने सुरू केले आहेत. सध्या ते एकूण ५ कारखान्यांचे संचालन करत आहेत.
दरवर्षी २० लाख टनांहून अधिक उसाचे गाळप करतानाच डिस्टिलरी आणि सह-निर्मिती प्रकल्पाच्या (Co-generation) माध्यमातून वीज निर्मिती करून कारखान्याचे उत्पन्न वाढवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.


Recent Comments