नीट परीक्षा पेपर लीक आणि सीबीएसई परीक्षांमधील गोंधळाच्या निषेधार्थ धारवाडमध्ये एआयडीएसओ संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

कलाभवन ते विवेकानंद सर्कलपर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकार आणि एनटीए विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या परीक्षांमधील गोंधळाला कोचिंग माफियाच जबाबदार असून ‘एनटीए’ त्यांच्या हातातील बाहुले बनले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. देशातील कोचिंग इंडस्ट्रीची उलाढाल हजारो कोटींवर गेली असताना सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि एनटीए संस्था रद्द करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एआयडीएसओ विद्यार्थी संघटनेने दिला आहे.


Recent Comments