Khanapur

खानापूरमध्ये मराठी शाळा टिकवण्यासाठी समितीचे बीईओंना निवेदन

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आज क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

लोंढा परिसरातील गवळीवाडामधील मराठी शाळेच्या शिक्षकांची बदली करून तिथे कन्नड माध्यम सुरू करण्याचा प्रशासकीय प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करून मराठी शाळांचे कन्नडीकरण करणे थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच गुंजी गावातील मराठी शाळा बंद करण्याचा आणि खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मुले-मुलींच्या शाळांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी माजी आमदार दिगंबर पाटील, मएस अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, दीपक देसाई, प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, धनंजय पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते. बीईओ पी. रामप्पा यांनी मागण्या सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

Tags: