चिक्कोडीमधील केएलई संस्थेच्या स्वतंत्र पीयू विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे माजी आमदार आणि संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी स्पष्ट केले.


पीयूसी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून पालकांनी मुलांची इतरांशी तुलना करून त्यांच्यावर विनाकारण दबाव आणू नये, असे आवाहन महांतेश कवटगीमठ यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी केएलई संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे महागडे शिक्षण ही संस्था चिक्कोडीमध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देत असून विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आत्मविश्वासाने शिक्षण घ्यावे, असे प्रा. सी. एम. त्यागराज यांनी म्हटले.
याच कार्यक्रमात जेईई, नीट आणि द्वितीय पीयूसी वार्षिक परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. या सोहळ्याला केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दर्शन बिळूरे, विनोद सावंतगौडर, सचिन मेक्कळकी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य पी. वेंकट रेड्डी यांनी स्वागत केले, महेश सनियावर यांनी प्रार्थना म्हटली, शिवानंद उन्हाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुजीता चंदरगी आणि कुमारी ऋतू कराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पवनकुमार यांनी आभार मानले.


Recent Comments