पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे खरे सत्य जनतेपासून लपवून ठेवले आहे, अशी घणाघाती टीका एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला.

निवडणुका संपल्यानंतर इंधनाचे दर वाढवण्याऐवजी, हिंमत असती तर मोदींनी हा निर्णय निवडणुकीपूर्वीच जाहीर करायला हवा होता. मात्र, याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होईल याच भीतीपोटी त्यांनी हे धोरण अवलंबले, अशी टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारच्या अशा धोरणांमुळे देशातील गरीब जनतेला मिळणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा आणि सबसिडी योग्य प्रकारे मिळत नाही आहेत, असा आरोप खर्गे यांनी केला. या वेळी देशातील गरीब आणि सामान्य जनतेच्या हितासाठी इंधन दरवाढ तसेच केंद्राच्या भेदभावपूर्ण धोरणाविरोधात संसदेत कडक आवाज उठवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments