बेळगावमधील सदाशिवनगर मुख्य रस्त्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष १.३ कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला.


भूमिपूजनानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, विविध विकासकामांमुळे सदाशिवनगरमधील मुख्य रस्त्याची दरावस्था झाली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या विशेष १.३ कोटी रुपयांच्या निधीतून लक्ष्मी कॉम्प्लेक्सपासून पुढील चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता, पेव्हर्स आणि भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. तसेच नागरिकांच्या आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार उर्वरित अंतर्गत रस्त्यांचाही टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल.


या प्रसंगी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सविता कांबळे, अमान सेठ यांच्यासह कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.



Recent Comments