प्राथमिक शाळा ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी जनीवार, हिजाब, रुद्राक्ष किंवा इतर धार्मिक चिन्हे परिधान करू शकतात. जे परंपरेने आणि साप्रदायिक पद्धतीने सुरू आहे, ते धार्मिक चिन्हे वापरण्यास हरकत नाही, मात्र नवीन काही सुरू करू नये, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.

म्हैसूरमधील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. धार्मिक चिन्हांच्या मुद्द्यावरून भाजपने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान मोदींनी डिझेलची बचत करण्यासाठी आपला ताफा कमी केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, “हे केवळ तात्कालिक पाऊल आहे. पंतप्रधानांचे हे म्हणणे योग्य नाही, त्याऐवजी इतर देशांशी चर्चा करून ठोस धोरण ठरवणे गरजेचे आहे.”
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, “मंत्रिमंडळ फेरबदल करण्याचा आमचा उद्देश आहे,” असे सांगत त्यांनी लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे संकेत दिले.
नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “केंद्र सरकारने नीट परीक्षेचे नियोजन योग्य प्रकारे केलेले नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे,” अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.


Recent Comments