शाळा-महाविद्यालयांमधील हिजाब बंदीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेने हुबळीतील संगोळी रायण्णा चौकात तीव्र निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमांना आग लावून संताप व्यक्त करण्यात आला.


यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक म्हणाले की, “मागील भाजप सरकारने हिजाब संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करून सध्याचे सरकार हिजाबला परवानगी देत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे.”

“या निर्णयाविरुद्ध आम्ही कायदेशीर लढा देऊ. जर शाळांमध्ये हिजाबला परवानगी दिली गेली, तर आम्ही सर्व हिंदू विद्यार्थ्यांना वर्गात केशर शाल घालून येण्याचे आवाहन करू,” असा इशारा प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. यावेळी अप्पणा दिवटगी, मंजुनाथ काटकर, यशोदा तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments