hubbali

नेहा हिरेमठ हत्या प्रकरणातील आरोपीचा पाचव्यांदा जामीन फेटाळला

Share

हुबळीतील बीव्हीबी महाविद्यालयात भरदिवसा झालेल्या नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, हुबळी न्यायालयाने आरोपी फयाजचा जामीन अर्ज पाचव्यांदा फेटाळून लावला आहे. नेहाच्या वकिलांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे मारेकऱ्याला पुन्हा एकदा कोठडीतच राहावे लागणार आहे.

१८ एप्रिल २०२४ रोजी फयाजने नेहाची महाविद्यालयातच निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. राज्य सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे सोपवून लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दोन वर्षे उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही.

आरोपी फयाजने जामिनासाठी सलग पाच वेळा न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र नेहाच्या बाजूने वकील राघवेंद्र मुतगीकर यांनी मांडलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.

लोकांच्या वाढत्या दबावामुळे सरकारने हे प्रकरण त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप विशेष न्यायालयाची स्थापना झालेली नाही. या विलंबामुळे नेहाच्या कुटुंबीयांना न्यायासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

नेहाच्या वतीने वकील राघवेंद्र मुतगीकर यांनी न्यायालयात सलग संघर्ष सुरू ठेवला असून, मारेकऱ्याचा जामीन फेटाळून लावण्यात त्यांना यश आले आहे.

Tags: