Belagavi

चचडी उपसा सिंचन योजनेसाठी शेतकरी आक्रमक

Share

चचडी उपसा सिंचन योजना त्वरित पूर्ण करून कालव्यांना पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी सरकारला दिला आहे. यासंदर्भात शेतकरी नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

चचडी उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी नेते कुमार तिगडी यांनी केली आहे. तसेच खनगाव आणि वन्नूर भागातील कालव्यांची स्वच्छता करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रदेशाध्यक्ष चूनप्पा पूजेरी आणि कार्याध्यक्ष शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नेसरगी महामार्ग रोखून धरणार असल्याची प्रतिक्रिया कुमार तिगडी यांनी व्यक्त केली आहे.

पाण्याअभावी पिके करपत असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी कुमार तिगडी यांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Tags: