आंतरराष्ट्रीय अलायन्स क्लब समाजसेवा आणि पर्यावरण रक्षणात महत्त्वाचे योगदान देत असून, हवामान बदल रोखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अलायन्स क्लबचे साऊथ मल्टिपल कौन्सिल चेअरमन अलय मोरा अंजय्या यांनी केले आहे.


अथणीमधील एका सभागृहात आयोजित अलायन्स क्लब बेळगाव-१३१ अथणी शाखेच्या पदग्रहण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.


या कार्यक्रमात एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून राज्यात प्रथम आलेली कटगेरी गावच्या शेतकऱ्याची मुलगी प्रार्थना नागप्पा बिरादार पाटील आणि यूपीएससी परीक्षेत देशात यश मिळवणारा सवदी गावच्या शेतकऱ्याचा मुलगी बसवराज दरीयप्पा केंपवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असून अथणी हा प्रतिभावंतांचा तालुका असल्याचे जिल्हा गव्हर्नर रत्नाकर शेट्टी यांनी म्हटले.
प्रार्थना आणि बसवराज यांच्या या यशामागे त्यांच्या पालकांचा त्याग आणि प्रोत्साहन कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ विधिज्ञ के. एल. कुंदरगी यांनी दिली.
या सोहळ्यात नवीन पदाधिकाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या प्रसंगी डॉ. नवीना शेट्टीगार, माजी जिल्हा गव्हर्नर बसवराज कोळी, डॉ. डी. एम. बेन्नूर, एस. पी. जैनापूर, धन्यकुमार पाटील, रमेश हेडगे, रूपा पाटील, राजकिशोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता झाली.


Recent Comments