चिकोडीमधील नागरमुन्नोळी होबळी कार्यक्षेत्रात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिल्या आहेत.

चिकोडीमधील मिनी विधानसौधमध्ये आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी कोटबागी उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, जल जीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि हेस्कॉमने ट्रान्सफॉर्मर्सचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नागरमुन्नोळी होबळी कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून जैनापूर आणि नागरमुन्नोळी पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिक आणि जनावरांची सोय करावी, अशा सूचना आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिल्या.

ममदापूर, मीरापूरहट्टी, चन्यानदड्डी, खजगौडनहट्टी आणि उमराणी या गावांमध्ये टँकरची गरज असून काही शेतवस्ती भागांतही पाणीटंचाई निर्माण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासक आणि विकास अधिकाऱ्यांची आहे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी दिले. या बैठकीला तहसीलदार राजेश बुर्ली, कार्यकारी अभियंता पांडुरंगराव, बी. आर. जंबगी, महांतेश हिंगलजे आणि शिवानंद शिरगावे उपस्थित होते.


Recent Comments