कागवाड मतदारसंघातील खिळेगाव विभाग ४१ आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मंगसुळी गावामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.


रविवारी सकाळी मंगसुळी गावातील संत तुकाराम महाराज मंदिरात हे शिबिर पार पडले. ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हा संत निरंकारी सद्गुरूंचा संदेश अमलात आणण्यासाठी प्रत्येक शाखेच्या वतीने असे उपक्रम राबवले जात आहेत. सांगली येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या डॉक्टरांनी या मोहिमेत रक्त संकलन केले असून, एकूण २०० दात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन बेंगळुरू येथील झोनल प्रभारी सुनीलकुमार राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खिळेगाव विभागाचे संचालक विजय माने, सौंदर्गा समन्वयक गणपती गाडीवडर, महांतेश पाटील यांच्यासह अनेक अनुयायी उपस्थित होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यातून अनेकांचे प्राण वाचवता येतात, अशी माहिती सुनीलकुमार राव यांनी दिली.


Recent Comments