Kagawad

कागवाड मतदारसंघात रस्ते कामांचे भूमिपूजन

Share

राज्यातील प्रत्येक गावात दर्जेदार रस्ते, शाळा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री विशेष भर देत असून, मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे पूजन पार पडले असल्याची माहिती आमदार राजू कागे यांनी दिली.

बुधवारी मंगसुळी-फरीदखानवाडी रस्ते सुधारणेसाठी ३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे आणि शेडबाळ नगरपंचायत व्याप्तीमधील प्रभाग क्रमांक ११, १२, १४ व १६ मध्ये ५५ लाख रुपयांच्या रस्ते कामांचे भूमिपूजन आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान (फेज-४) अंतर्गत या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंगसुळी येथील कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा विधी पार पडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. मगदूम, कंत्राटदार बसवराज पाटील, संजय तळवलकर, महादेव कटिगेरी, मुकुंद पुजारी, वीरभद्र कटिगेरी, प्रभू पुजारी, दिलीप मगदूम आणि मिलिंद वराळे उपस्थित होते.

शेडबाळ शहरात झालेल्या कार्यक्रमात नगरपंचायत अध्यक्ष उत्कर्ष पाटील, मुख्याधिकारी के. के. गावडे, अभियंता तिरुपती राठोड, कंत्राटदार बसवराज मगदूम, विनोद बरगाले, भरतेश नांद्रे, नेमगौडा घेनाप्पगूळ, प्रकाश माळी, अजित रंजुणिगे, प्रमोद खोत आणि शीतल हेरलेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: