बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात आज भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण धडकेत पती-पत्नीसह त्यांच्या सात वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

रायबाग तालुक्यातील आलखनूर गावाजवळ बुधवारी सायंकाळी हा अपघात घडला. गिरेप्पा कुंद्राळी (३८), मंजुळा गिरेप्पा कुंद्राळी (२८) आणि त्यांची सात वर्षांची मुलगी आराध्या अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब एकाच दुचाकीवरून मिरज येथून जमखंडीच्या दिशेने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या वेगवान ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि या तिघांनीही जागीच प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच हारूगेरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील वाहनांचा अतिवेग या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments