Chikkodi

निपाणीत गांजा विक्री करणारी जोडगोळी जेरबंद

Share

सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या जोडगोळीला निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत जेरबंद केले आहे.

प्रतीक तानाजी शिंदे (वय २०, रा. कोगनोळी) आणि सार्थक धनाजी गणेशकर (वय २०, रा. शिवाजी नगर, कागल, जि. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.

कोगनोळी गावाच्या हद्दीतून मत्तीवडेकडे जाणाऱ्या रस्त्याकाठी गांजाची विक्री केली जात असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवराज बी. नायकवडी व सहकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईत १०,००० रुपये मूल्याचा २१८ ग्रॅम गांजा, ५०० रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर प्लस दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: