चिक्कोडी येथे तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती आणि जमाती तक्रार निवारण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिक आणि दलित नेत्यांनी विविध समस्या मांडल्या.

ग्रामपंचायतींमध्ये इ-स्वत्तु आणि हस्तलिखित उतारे मिळत नसल्याचा प्रश्न रावसाहेब फकीरे आणि नंदकुमार दरबार यांनी उपस्थित केला. यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

करोशी गावात पिण्याच्या पाण्यात अळ्या येत असल्याचा आरोप शोभा तळवार यांनी केला. अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पीडीओंवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

जोडकुरुळी गावातील सरकारी रुग्णालयाची ५ एकर जागा अतिक्रमीत झाल्याचे मारुती कांबळे यांनी सांगितले. यावर अतिक्रमण हटवून कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले.
सरकारी रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याऐवजी पैसे उकळले जात असल्याचे सुदर्शन तमण्णावर यांनी सांगितले. त्यावर यापुढे अशा तक्रारी येणार नाहीत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खणदाळे यांनी स्पष्ट केले.
काडापूर गावाला योग्य बससेवा पुरवण्याची मागणी दीपिका कांबळे यांनी केली. तसेच विकासकामांच्या अनुदानाबाबत काही अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप महेश शिंगे यांनी केला.
या बैठकीस समाजकल्याण अधिकारी अर्चना साने, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी डॉ. रविराज हुक्केरी, सीपीआय विश्वनाथ चौगुला आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments