चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर येथील विविध कार्यकारी प्राथमिक ग्रामीण कृषी पतसंस्थेच्या नूतन इमारत व व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्ज मर्यादेत वाढ केल्याची घोषणा केली.


बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले की, शून्य टक्के व्याजदराच्या कर्जाची मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रति एकरी कर्जमर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.


जिल्ह्यात १२० डीसीसी बँक शाखा असून ९० टक्के गावांपर्यंत थेट पोहोचण्यात अडचणी आहेत. यावर उपाय म्हणून चांगल्या प्राथमिक सहकार संस्थांना बँकेच्या शाखा मानून, त्यांच्यामार्फतच दुचाकी, चारचाकी आणि गृहकर्ज वाटप करण्याची नवी योजना लागू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रकाश हुक्केरी यांच्या २२ लाख रुपयांच्या निधीतून सभागृह व दुकाने उभारल्याचे सांगून आभार मानले. आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे सांगितले. चिंचणीचे शिवप्रसाद स्वामीजी यांनीही यावेळी मार्गदर्शक विचार मांडले.
या कार्यक्रमाला डीसीसी बँकेचे बी. एस. गुडसी, राजू मुन्नोळी, संस्थेचे उपाध्यक्ष बसवराज माळगे, संचालक ईरप्पा मंगाजे, बाबासाब घरबुडे, दुंडप्पा घरबुडे, अशोक खाडा, ईरगौडा सोलन्नवर, अशोक लिंगनूरे, शशिकला भाकरे, अवक्का जोगे, प्रकाश टोपूगोळ आणि ईरगौडा केळगीमनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments