Vijayapura

दुष्काळ निवारणासाठी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

Share

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत निधी जमा करण्याची अनोखी मोहीम अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेने हाती घेतली आहे.

याबाबत माहिती देताना विजापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, उद्या ताळिकोटी येथील खासगतेश्वर मठात पूजा करून या देणगी मोहिमेचा प्रारंभ केला जाईल. दुष्काळामुळे शेतकरी अत्यंत संकटात सापडले असून त्यांना योग्य भरपाई मिळावी ही मुख्य मागणी आहे. ताळिकोटी येथून सुरू होणारी ही मोहीम आगामी काळात इतर भागातही राबवण्याचा विचार संघटना करत आहे.

Tags: