चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी ग्रामपंचायतीला उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.


उपलोकायुक्तांनी हजेरी पुस्तक, विकास कामांवरील खर्च आणि योजनांशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली


उपलोकायुक्तांच्या भेटीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कार्यालय परिसरात गर्दी केली. पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांकडून कामात मिळणाऱ्या अपुऱ्या प्रतिसादाबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या.
सर्व तक्रारींची दखल घेत बी. वीरप्पा यांनी जनतेच्या कामांत हलगर्जीपणा आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

यावेळी लोकायुक्त कर्मचारी, ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments