उपलोकायुक्त न्यायमूर्ती वीरप्पा यांनी गुरुवारी चिकोडी नगरपालिकेला अचानक भेट देऊन पाहणी केली.


नगरपालिकेचे जन्म-मृत्यू, ई-स्वत्त्व, ई-खाते, बी-खाते यांसह विविध विभागांना भेट देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तिका आणि कागदपत्रांची तपासणी केली. शहरातील इमारत बांधकाम परवानग्या, कचरा व्यवस्थापन वाहनांचा तपशील, पथदिव्यांची देखभाल व खर्च तसेच नवीन लेआउटच्या मंजुरीची माहिती त्यांनी घेतली. तसेच कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन वर्षांच्या पगाराचा तपशील सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले. शहरात अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम असल्यास नागरिकांनी थेट लोकायुक्तांकडे तक्रार करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी सचिव अरविंद, जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, लोकायुक्त एसपी प्रसन्न देसाई, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, उपविभागीय अधिकारी एस. एस. संपगावी, जिल्हा पंचायत प्रकल्प संचालक रवू बंगारप्पनवर, तहसीलदार आर. आर. बुर्ली व मुख्याधिकारी जगदीश ईटी उपस्थित होते.



Recent Comments