विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना अटक करण्यात चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

संशयितांकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या २०० किलो ॲल्युमिनियमच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

चिक्कोडी येथील जिल्हा पंचायत आणि शंभुलिंगेश्वर नगर भागात नव्याने उभारलेल्या खांबांवरील तारा चोरीला गेल्याची तक्रार पर्यवेक्षक अभियंता संतोष पाटील यांनी ७ ऑगस्ट रोजी दाखल केली होती.
बेलगावी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. के. रामराजन आणि अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयपी विश्वनाथ लमाणी व सहकाऱ्यांनी सापळा रचून या चोरांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत पोलिसांनी ५५ हजार व ५० हजार रुपयांच्या दोन स्प्लेंडर प्लस दुचाकींसह ७० हजार रुपये मूल्याचा २०० किलो गांजासदृश मुद्देमाल आणि ॲल्युमिनियम तारा जप्त केल्या आहेत.


Recent Comments