Vijayapura

एसआयआर प्रक्रियेविरोधात अभिनेते प्रकाश राज आक्रमक

Share

विजापूर येथील आंबेडकर चौकात आयोजित एसआयआर जनजागृती कार्यक्रमात अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज यांनी विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवर जोरदार टीका केली.

विशेष मतदार पुनरीक्षण प्रक्रियेत जिवंत व्यक्तींना मृत दाखवून मतदार यादीतून नावे वगळली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

कर्नाटकात भाजप नेते आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मतदार यादीतून नावे हटवण्यासाठी फॉर्म नंबर ७ चा गैरवापर करत असल्याचे सांगत, यासंदर्भात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

देशात एसआयआरच्या माध्यमातून एनआरसी लागू करण्याचा प्रयत्न सुरू असून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी जागरूक राहून मतदानाचा हक्क वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन प्रकाश राज यांनी केले.

Tags: