१४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सौहार्दाने सण साजरा करण्यासाठी आज धारवाड येथे पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांच्या नेतृत्वात सर्व धर्मीय प्रमुखांची शांतता बैठक पार पडली. या बैठकीस मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू धर्मातील ज्येष्ठ नागरिक तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.


शहरातील विद्यावर्धक संघ येथे हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत उपस्थितांचे विचार व सूचना ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी स्पष्ट केले की, कायद्याचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपला सण इतरांसाठी आदर्श ठरेल अशा रीतीने साजरा झाला पाहिजे. सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन शांततेत सण साजरा केल्यास उत्सवाचा आनंद द्विगुणीत होतो.

गणेशोत्सवादरम्यान कोणीही कायदा हातात घेतल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. तसेच डीजे आणि ध्वनिक्षेपकाबाबत दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.


Recent Comments