Bellary

बळ्ळारीत भीषण अपघात, मायनिंग लॉरी अंगावरून गेल्याने दोघे जागीच ठार

Share

बळ्ळारी जिल्ह्यातील संदूर तालुक्यात घडलेल्या भीषण रस्ते अपघातात दोघे तरुण जागीच मृत झाले आहेत. लॉरी चालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संधूर तालुक्यातील वेंकटगिरी गावाजवळ रस्त्याच्या कडेने चालत जात असताना, पाठीमागून आलेल्या मायनिंग लॉरीने उडवल्यामुळे दोघे जण गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पावले.

या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, संदूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी संदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Tags: