बळ्ळारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पथकाने पाहणी दौरा केला. यावेळी पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.


राज्यातील पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांचे पथक बळ्ळारी जिल्ह्यात दाखल झाले. दौऱ्यादरम्यान पथकाने सिडगीनमोळ आणि कारेकल गावांना भेट देऊन शेतीची स्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची पाहणी केली.


यावेळी आर. अशोक यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक नुकसान, कर्जाचा भार आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबाबत माहिती घेतली.

या दुष्काळ पाहणी दौऱ्यात आमदार भैरती बसवराज, बी. पी. हरीश, कृष्णा नाईक तसेच गंगावतीचे आमदार जनार्दन रेड्डी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजनांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले.



Recent Comments