Belagavi

मुतगा गावात श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू

Share

बेळगाव तालुक्यातील मुतगा गावात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्री भावेश्वरी देवीची वार्षिक जत्रा धार्मिक वातावरणात सुरू झाली आहे. देवीला श्रीफळाऐवजी सुके खोबरे अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली आहे.

शुक्रवारपासून सुरू झालेल्या या जत्रेत कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मुतगा आणि खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक संबंधांमुळे या भागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय आहे.

जत्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांनी जय्यत तयारी केली असून, भाविकांनी वाहने ठरिक ठिकाणी उभी करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बाहू पाटील यांनी दिली. तसेच भाविकांनी परंपरेनुसार केवळ खोबरेच अर्पण करावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.

Tags: