बळ्ळारीतील आंद्राळू भागात माय-लेकराची हातोड्याने डोक्यात मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्येच्या थराराने संपूर्ण शहर हादरले आहे.

राजेश्वरी (२५) आणि तिची सात महिन्यांची मुलगी अश्विनी रात्री झोपेत असताना ही रक्ताळलेली घटना घडली. चारित्र्याचा संशय आणि हुंड्याच्या हव्यासापोटी पती होन्नूरस्वामी याने मोठ्या हातोड्याने दोघांच्या डोक्यावर वार करून त्यांचा गेम वाजवला. कृत्य उरकून पसार झालेल्या या नराधम आरोपीच्या एपीएमसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, बिम्स (BIMS) रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर मृत महिलेच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या क्रूर हत्येमागे आरोपीच्या आईचाही हात असल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला असून, आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments