Bellary

बळ्ळारी येथे त्रिकोण प्रेमातून एका आयटी महिला कर्मचाऱ्याने माजी प्रियकराच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणीने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर करत आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रकरणी कौलबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत कार्यरत असलेली आणि बळ्ळारीच्या कौलबाजार येथील रहिवासी असलेली फिरदोस ही तरुणी सुरुवातीला अजीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. मात्र त्याच्या वर्तनाला कंटाळून ती त्याच्यापासून दूर झाली आणि अजीमचा मित्र सोहेल याच्याशी तिचे सूत जुळले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट समजताच पहिला प्रियकर अजीम याने तिच्याकडील खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले. दोन्ही प्रियकरांच्या त्रासाला कंटाळलेल्या फिरदोसने आत्महत्येपूर्वी नव्या प्रियकराला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत, “माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी करत तिने आपले जीवन संपवले. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कौलबाजार पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Share

बळ्ळारी येथे त्रिकोण प्रेमातून एका आयटी महिला कर्मचाऱ्याने माजी प्रियकराच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्येपूर्वी या तरुणीने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर करत आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रकरणी कौलबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंगळुरू येथील आयटी कंपनीत कार्यरत असलेली आणि बळ्ळारीच्या कौलबाजार येथील रहिवासी असलेली फिरदोस ही तरुणी सुरुवातीला अजीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. मात्र त्याच्या वर्तनाला कंटाळून ती त्याच्यापासून दूर झाली आणि अजीमचा मित्र सोहेल याच्याशी तिचे सूत जुळले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट समजताच पहिला प्रियकर अजीम याने तिच्याकडील खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले.

दोन्ही प्रियकरांच्या त्रासाला कंटाळलेल्या फिरदोसने आत्महत्येपूर्वी नव्या प्रियकराला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत, “माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी करत तिने आपले जीवन संपवले. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कौलबाजार पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Tags: